Egyptians बद्दल बायबलमधील वचने: Prophecies of dispersion and restoration of
Prophecies of dispersion and restoration of बद्दल वचने
उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.
“ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन.
बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल.
ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही.