- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Edomites बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.
एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल.
पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.
ऊस प्रांतात राहणार्या एदोम कन्ये, हर्ष कर व उल्हासित हो. परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.
सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला,
म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.
माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
“एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.
“उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत.
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, सेईर पर्वताकडे मुख करून त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर
आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन.
मी तुझी नगरे निष्फळ करेन आणि तू उजाड होशील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
“ ‘कारण तुझ्याठायी तू निरंतर वैर ठेवले आणि संकटाच्या काळी, जेव्हा त्यांच्या शिक्षाकाळ कळसाला जाऊन पोहोचला, तेव्हा तू इस्राएली लोकांवर तलवार चालविली,
म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, मी तुला रक्तपाताच्या स्वाधीन करेन आणि रक्तपात तुमचा पाठलाग करेल. कारण तू रक्तपाताचा द्वेष केला नाही, म्हणून रक्तपात तुझा पाठलाग करेल.
मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन.
वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्यात आणि तुझ्या ओहोळात पडतील.
मी तुला कायमचे ओसाड करेन; तुझ्या नगरांत पुन्हा कोणीही वसणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
“ ‘कारण मी याहवेह तिथे होतो तरीही तुम्ही म्हटले, “हे दोन देश व राष्ट्रे आमची होतील आणि आम्ही त्याचे वतन पावू,”
म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, त्यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही जो राग व हेवा प्रकट केला त्यानुसार मी तुमच्याशी वागेन आणि जेव्हा मी तुमचा न्याय करेन, तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रकट करेन.
तेव्हा तुम्ही जाणाल मी याहवेहने त्या तिरस्करणीय गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुम्ही इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध उच्चारल्या. तुम्ही म्हटले, “ते उजाड पडले आहेत आणि आम्ही गिळून टाकावे म्हणून त्यांना आमच्या हाती दिले आहे.”
तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले.
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन.
कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”