Dreams बद्दल बायबलमधील वचने: Pharaoh
Pharaoh बद्दल वचने
दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता.
तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या.
नंतर नाईलमधून दुसर्या सात गाई आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या आणि नदीकाठी असलेल्या गाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या.
मग त्या सात दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. यावर फारोहची झोपमोड झाली.
यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली.
मग आणखी सात कणसे उगवली, पण ही वाळून गेलेली आणि पूर्वेच्या वार्याने कोमेजून गेलेली होती.
या सात अशक्त कणसांनी टपोर्या दाण्यांची ती भरदार कणसे गिळून टाकली. नंतर फारोह जागा झाला आणि हे सर्व स्वप्न होते हे त्याला समजले.