Dreams बद्दल बायबलमधील वचने: God the only interpreter of
God the only interpreter of बद्दल वचने
दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही,
परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
“महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे.
माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे.