Decision बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
परंतु परमेश्वराच्या मनुष्याने राजाला उत्तर दिले, “तू जरी मला तुझी अर्धी संपत्ती दिली, तरीही मी तुझ्याबरोबर जाणार नाही, या ठिकाणी ना मी भाकर खाणार, ना पाणी पिणार.
कारण याहवेहच्या वचनाने मला आज्ञा दिली आहे: ‘तू तिथे ना भाकरी खावी ना पाणी प्यावे किंवा ज्या वाटेने तू जातोस त्या वाटेने परत येऊ नये.’ ”
म्हणून ज्या मार्गाने तो बेथेलास आला होता त्याने न जाता, दुसर्या मार्गाने रवाना झाला.
तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.
तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार कर, आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.
त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”
आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”
येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.”
आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.”
पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”
म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.
“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.
कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती,
अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा.
त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा.
परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.
सर्वांना जीवन देणार्या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो
आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव.
जो चांगल्या शिक्षणाचा नमुना तू माझ्याकडून ऐकला, तो ख्रिस्त येशूंमधील विश्वास आणि प्रीती याबरोबर दृढ धरून राहा.
आमच्या ठायी वस्ती करीत असलेल्या पवित्र आत्म्याकडून मिळालेली चांगली ठेव सांभाळ.
परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.