Skip to content

Decision बद्दल बायबलमधील वचने: Exhortation to

12 वचने · 26 पैलू

Exhortation to बद्दल वचने

  1. त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

  2. येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”

  3. आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

  4. येशूंनी त्याला उत्तर दिले, “जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे, परंतु तू जा आणि परमेश्वराच्या राज्याची घोषणा कर.”

  5. आणखी एकजण म्हणाला, “प्रभूजी, मी निश्चितच येईन. पण प्रथम माझ्या घरच्या लोकांचा निरोप घेऊ द्या.”

  6. पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”

  7. तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा.

  8. त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा.

  9. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

  10. विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.

  11. सर्वांना जीवन देणार्‍या परमेश्वरासमक्ष आणि पंतय पिलातासमोर निर्भयपणाने साक्ष देणार्‍या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आज्ञा करतो

  12. आपले प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत या आज्ञा दोषरहित आणि निर्दोष ठेव.