Skip to content

Animals बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले.

  2. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

  3. कोणतेही निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्न तुम्ही खाऊ नये.

  4. तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे,

  5. सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.

  6. ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  7. तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत.

  8. डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.

  9. पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.

  10. परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.

  11. कोणतेही शुद्ध पक्षी खाण्यास योग्य आहेत.

  12. परंतु हे पक्षी तुम्ही खाऊ नये: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

  13. लाल पतंग, काळे पतंग, निरनिराळ्या जातीच्या घारी,

  14. कोणत्याही जातीचे कावळे,

  15. शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,

  16. लहान घुबड, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड,

  17. वाळवंटी घुबड, कुरर, करढोक,

  18. करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.

  19. सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये.

  20. पण पंख असलेले कोणतेही पक्षी जे शुद्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता.

  21. “परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील, किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;

  22. अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.

  23. कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;

  24. पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत, भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.

  25. मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.