Skip to content

Animals बद्दल बायबलमधील वचने: Habits of

10 वचने · 25 पैलू

Habits of बद्दल वचने

  1. “परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील, किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;

  2. अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.

  3. ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.

  4. सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.

  5. सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात.

  6. मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात, व सायंकाळपर्यंत परिश्रम करतात.

  7. हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे: अद्भुत ज्ञानाने तुम्ही सर्व घडविले आहे; तुमच्या रचनेने संपूर्ण पृथ्वी संपन्न झाली आहे.

  8. एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे.

  9. परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, तरसानी तिची घरे भरून जातील; तिथे घुबडे राहतील, आणि तिथे बोकडे उड्या मारतील.

  10. तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. तिची वेळ फार जवळ आली आहे, आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.