Animals बद्दल बायबलमधील वचने: Nature of
Nature of बद्दल वचने
मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, “परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत.
खरोखर मानवाचे नशीब हे इतर प्राण्यांप्रमाणे आहे; सारखेच नशीब हे दोघांसाठी वाट पाहत असते: जसा एक मरतो, तसाच दुसराही मरतो. सर्वांना सारखाच श्वास आहे; इतर प्राण्यांपेक्षा मानवाला अधिक लाभ नाही. सर्वकाही व्यर्थ आहे.
सर्वकाही एकाच ठिकाणी जाणार आहेत; सर्व मातीतून येतात आणि पुन्हा मातीत जाऊन मिळतात.
मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?”