Skip to content

Animals बद्दल बायबलमधील वचने

136 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली.

  2. यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचा वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली.

  3. मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते.

  4. मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”

  5. जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!”

  6. मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या.

  7. आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले.

  8. सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्‍या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले.

  9. नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.

  10. तेव्हा तो पशू, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये, जो घोड्यावर बसला होता त्याच्याविरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एकत्र होत असलेले मी पाहिले.

  11. त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.