मुख्य मजकुरावर जा

Hebron

56 verses

31.5300, 35.0900 गूगल नकाशावर पाहा

Hebron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली.

  2. हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.

  3. त्यांनी असाहेलला घेतले आणि बेथलेहेम येथे त्याच्या वडिलांच्या कबरेत पुरले. नंतर योआब आणि त्याच्या माणसांनी रात्रभर प्रवास केला आणि पहाटेस हेब्रोनास येऊन पोहोचले.

  4. हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता;

  5. आणि सहावा पुत्र इथ्रियाम हा दावीदाची पत्नी एग्लाहपासून झाला.

  6. अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.

  7. जेव्हा अबनेर त्याच्या बरोबरच्या वीस माणसांना घेऊन दावीदाकडे हेब्रोनास आला, तेव्हा दावीदाने त्याच्यासाठी आणि त्याच्या माणसांसाठी मेजवानी तयार केली.

  8. त्याचवेळेस दावीदाची माणसे आणि योआब छापा घालून परतले आणि आपल्याबरोबर मोठी लूट आणली. परंतु अबनेर दावीदाबरोबर हेब्रोनमध्ये नव्हता, कारण दावीदाने त्याला रवाना केले होते आणि तो शांतीने गेला होता.

  9. जेव्हा अबनेर हेब्रोनास परत आला, तेव्हा योआबाने त्याला आतील खोलीत बाजूला नेले जसे की, त्याला त्याच्याबरोबर काही खाजगी बोलावयाचे आहे. आणि तिथे त्याचा भाऊ असाहेल याच्या रक्ताचा सूड घ्यावा म्हणून योआबने त्याच्या पोटावर वार केला आणि तो मरण पावला.

  10. त्यांनी अबनेरास हेब्रोनमध्ये पुरले आणि राजाने अबनेरच्या कबरेजवळ मोठ्याने आकांत केला. सर्व लोकसुद्धा रडले.

  11. जेव्हा शौलाचा पुत्र इश-बोशेथ याने ऐकले की, अबनेर हेब्रोन येथे मरण पावला आहे, तेव्हा त्याचे धैर्य सुटले आणि सर्व इस्राएली सावध झाले.

  12. त्यांनी इश-बोशेथचे डोके हेब्रोनात दावीदाकडे आणले आणि राजाला म्हणाले, “हे पाहा, तुमचा शत्रू शौल ज्याने तुम्हाला जिवे मारावयास पाहिले, त्याचा पुत्र इश-बोशेथ याचे शिर. आज याहवेहने माझ्या धनीराजाच्या विरुद्ध शौल आणि त्याच्या संतानाचा सूड घेतला आहे.”

  13. तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.

  14. इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.

  15. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

  16. त्याने हेब्रोन येथून यहूदीयावर सात वर्षे आणि सहा महिने राज्य केले आणि सर्व इस्राएल व यहूदाह यांच्यावर यरुशलेमात तेहतीस वर्षे राज्य केले.

  17. दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.

  18. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.

  19. राजा त्याला म्हणाला, “शांतीने जा.” तेव्हा तो हेब्रोनकडे गेला.

  20. नंतर अबशालोमने इस्राएलच्या सर्व गोत्रांकडे गुप्त संदेशवाहक असे सांगत पाठवले, “रणशिंगांचा आवाज ऐकताच तुम्ही म्हणा, ‘हेब्रोनमध्ये अबशालोम राजा आहे.’ ”

  21. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.

  22. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती.

  23. हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.

  24. यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.

  25. अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,