मुख्य मजकुरावर जा

Hebron

56 verses

31.5300, 35.0900 गूगल नकाशावर पाहा

Hebron चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.

  2. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.

  3. दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.

  4. हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती.

  5. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले.

  6. सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती.