मुख्य मजकुरावर जा

Babylon

255 verses · 3 known names

हे नावानेही ओळखले जाते: Babylon's, Sheshach

32.5300, 44.4200 गूगल नकाशावर पाहा

Babylon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा बाबेलच्या राजाला तुच्छतेने तुम्ही म्हणाल: पाहा, तो जुलूमशहा कसा नाश पावला आहे! त्यांचा उन्मत्तपणा कसा नष्ट झाला आहे!

  2. सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” असे याहवेह घोषित करतात.

  3. पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”

  4. त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते.

  5. तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून माझ्याकडे आले आहेत.”

  6. अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व, बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात.

  7. आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”

  8. तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह असे म्हणतात— “तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन आणि सर्व बाबेलच्या लोकांना ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता, त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन.

  9. “हे कुमारी खाल्डियन कन्ये, सिंहासनावरून खाली उतर व धुळीत बस; हे बाबेल्यांच्या नगराची महाराणी, सिंहासन सोडून जमिनीवर बस. तू यापुढे कोमल व नाजूक म्हणविली जाणार नाहीस.

  10. “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.

  11. बाबेलमधून निघा, खास्द्यांपासून पलायन करा! हे हर्षगर्जना करून जाहीर करा व घोषित करा, “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या.

  12. याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.

  13. मी या नगरातील सर्व संपत्ती त्यांच्या शत्रूंच्या हातात देईन—सर्व उत्पादन, सर्व जडजवाहीर आणि यहूदीयाच्या राजांचा सर्व खजिना. ते त्यांना लुटतील आणि बाबेलला ते घेऊन जातील.

  14. आणि हे पशहूरा, तू स्वतः व तुझ्यासह तुझ्या घरात राहणारे सर्वजण बाबेलमध्ये बंदिवासात जाल. तू तिथेच मरशील व पुरला जाशील, तू व ज्यांच्याकडे तू खोटी भविष्यवाणी केलीस त्या तुझ्या सर्व मित्रगणाची गतही तशीच होईल.”

  15. “आम्हाला साहाय्य करावे, अशी विनंती याहवेहला कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आमच्यावर आक्रमण करणार आहे. याहवेह आमच्यावर कृपा करतील आणि प्राचीन काळी ते करीत असत तसा एखादा महान चमत्कार करून नबुखद्नेस्सरला सैन्य घेऊन परत जायला भाग पाडतील.”

  16. ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे.

  17. त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’

  18. कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’

  19. आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.

  20. बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या.

  21. यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यहूदीयाच्या सर्व लोकांबद्दल यिर्मयाहला संदेश मिळाला.

  22. मी उत्तरेकडील सर्व लोक व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांना एकवटेन. त्याच्या सर्व सैन्यांना मी या देशावर, येथील लोकांवर व तुमच्या आसपासच्या इतर राष्ट्रांवर आणेन. मी त्यांचा संपूर्ण नायनाट करून त्यांना दहशत, तिरस्कार व नाशाचा कायमचा विषय करेन,” याहवेह म्हणतात,

  23. हा सर्व देश ओसाड व पडीक असा होईल. हे देश सत्तर वर्षे बाबेलच्या राजाची सेवा करतील.

  24. “गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,

  25. तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.