मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत चौदा पिढ्या, बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

  2. येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा विवाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले.

  3. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”

  4. प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व घडून आले.

  5. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).

  6. तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले.

  7. येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले.

  8. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”

  9. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?”

  10. “ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा, यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”

  11. मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.”

  12. राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर ते शास्त्रज्ञ पुढे निघाले, जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जिथे होता, तिथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला.

  13. ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तिथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले.

  14. ते गेल्यानंतर, प्रभूचा एक दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण हेरोद बालकाचा शोध करून ठार मारण्याचा कट करीत आहे.”

  15. तेव्हा तो उठला, त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरीयेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला.

  16. हेरोद राजाचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला आणि अशाप्रकारे, “मी इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले!” असे जे प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते, ते भविष्य पूर्ण झाले.

  17. आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.”

  18. त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशामध्ये परतला.

  19. तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

  20. योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.

  21. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”

  22. तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले.

  23. पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आलात?”

  24. येशू त्याला म्हणाले, “आता असेच होऊ दे, कारण सर्व नीतिमत्व अशाप्रकारे पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केला.

  25. येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला;