मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला, जो माझा शिष्य आहे, त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

  2. येशूंनी आपल्या बारा शिष्यांना या सूचना देण्याचे संपविल्यावर, तिथून ते गालील प्रांतातील शहरांमध्ये उपदेश करण्यास व शिक्षण देण्यास गेले.

  3. जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता, ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी त्याने ऐकले, आपल्या शिष्यांना हे विचारावयास पाठविले,

  4. “जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍या कोणाची वाट पाहावी?”

  5. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा:

  6. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”

  7. योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

  8. तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.”

  9. हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “ ‘मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल.’

  10. मी तुम्हाला निश्चित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.

  11. “या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्‍या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:

  12. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्याने खरे सिद्ध झाले आहे.”

  13. मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली.

  14. परंतु मी तुम्हाला सांगतो, न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सोर व सीदोनला अधिक सुसह्य असेल.

  15. परंतु मी तुम्हाला सांगतो की न्यायाचा दिवस तुमच्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.”

  16. त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तुम्ही लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो.

  17. कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.

  18. “माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पित्याशिवाय पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.

  19. “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.

  20. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.

  21. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”

  22. शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले.

  23. जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”

  24. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  25. मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे.