मुख्य मजकुरावर जा

Jeremiah

124 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jeremy, Jeremias

Jeremiah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील.

  2. दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.

  3. जेव्हा यिर्मयाहने याहवेहचे वचन सर्व लोकांना सांगणे संपविले—जे सर्व त्यांना सांगण्यास याहवेह त्यांचे परमेश्वर यांनी त्याला पाठविले होते—तेव्हा

  4. होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.

  5. त्या जमावात पुरुष, स्त्रिया, मुले, राजाच्या कन्या व तसेच पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने अहीकामचा पुत्र, शाफानचा नातू गदल्याहच्या स्वाधीन केलेले सर्व लोक होते. त्यांनी यिर्मयाह संदेष्टा व नेरीयाहचा पुत्र बारूख ह्यांनाही आपल्याबरोबर घेतले.

  6. तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले:

  7. इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले:

  8. त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले:

  9. तेव्हा हे उत्तर देणार्‍या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला,

  10. मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!

  11. यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम राजा, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाह संदेष्ट्याने सांगितलेली याहवेहची सर्व वचने लिहून घेण्याचे काम नेरीयाहचा पुत्र बारूखाने संपविल्यानंतर, यिर्मयाहने हा संदेश त्याला दिला:

  12. राष्ट्रांसंबंधी यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:

  13. यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

  14. गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:

  15. यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याच्या कारकिर्दीच्या आरंभी एलामविषयी याहवेहकडून हा संदेश यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाला.

  16. बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:

  17. सिद्कीयाहच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी जेव्हा यिर्मयाह संदेष्ट्याने यहूदीयाचा राजा सिद्कीयाहसह बाबेलला गेला, तेव्हा त्याने सेरायाहस, जो नेरीयाहचा पुत्र, जो महसेयाहचा नातू, तो सैन्यात दुय्यम दर्जाचा एक अधिकारी होता त्याला हा संदेश दिला.

  18. बाबेलवर जी भयंकर अरिष्टे येणार होती, ती यिर्मयाहने एका गुंडाळीवर लिहिली—बाबेलवर येणाऱ्या सर्व अरिष्टांची नोंद करून ठेवण्यात आली होती.

  19. यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.

  20. आणि म्हण, ‘बाबेलही अशीच बुडेल व पुन्हा कधीही वर येणार नाही, कारण मी तिच्यावर अरिष्ट आणणार आहे, आणि तिच्यामधील लोक पडतील.’ ” इथे यिर्मयाहच्या संदेशाचा शेवट होतो.

  21. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील.

  22. संदेष्टा यिर्मयाह याच्याद्वारे जे सांगितले होते, ती भविष्यवाणी खरी ठरली ती अशी:

  23. त्यांनी उत्तर दिले, “काहीजण म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह म्हणतात; आणि आणखी काही यिर्मयाह किंवा संदेष्ट्यापैकी एक.”

  24. हे शेत विकत घेण्याच्या घटनेने यिर्मयाह संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण झाली. ती अशी: “त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली आणि इस्राएली लोकांनी त्याचे मोल ठरविले,