मुख्य मजकुरावर जा

Israel

1,007 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jacob

Israel चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले.

  2. आणि त्यांनी इस्राएलाच्या परमेश्वराला पाहिले. त्यांच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी निरभ्र आकाशासारखे होते.

  3. परंतु त्या इस्राएलाच्या वडिलांविरुद्ध परमेश्वराने आपला हात उगारला नाही; त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि त्यांनी खाणेपिणे केले.

  4. इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे दिसले.

  5. “इस्राएली लोकांना सांग की, त्यांनी मला अर्पण आणावे. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा आहे त्यांच्याकडून ते तू माझ्यावतीने स्वीकारावे.

  6. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  7. “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.

  8. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

  9. “तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.

  10. “दोन गोमेद रत्ने घेऊन त्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावीत.

  11. मोलवान रत्ने कोरणारे मुद्रेची कोरणी करतात त्याप्रमाणे तू त्या दोन रत्नांवर इस्राएलांच्या पुत्रांची नावे कोरून घ्यावी व ती दोन्ही रत्ने सोन्याच्या जाळीदार साच्यात बसवावी.

  12. आणि ते एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून रत्ने लावावी. याहवेहसमोर स्मारक म्हणून अहरोनाने ही नावे आपल्या खांद्यांवर वागवावी.

  13. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.

  14. “अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.

  15. जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”

  16. ती पाटी अहरोनाच्या फेट्यासमोर कपाळावर राहील आणि तो इस्राएलांच्या पवित्र भेटीसंबंधीचे दोष वाहील, त्यांच्या कोणत्याही भेटी असो. ती पाटी नित्य अहरोनाच्या कपाळावर असावी, अशासाठी की लोकांच्या भेटी याहवेहला मान्य होतील.”

  17. हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.

  18. तिथे मी इस्राएली लोकांना देखील भेटेन आणि ते ठिकाण माझ्या तेजाने पवित्र होईल.

  19. मग मी इस्राएली लोकात राहीन आणि त्यांचा परमेश्वर होईन.

  20. “तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही.

  21. इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”

  22. इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे.

  23. “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.

  24. इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा.

  25. तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ”