मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण स्वप्नाद्वारे हेरोदाकडे न जाण्याची सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या रस्त्याने त्यांच्या देशी परत गेले.

  2. ते गेल्यानंतर, प्रभूचा एक दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण हेरोद बालकाचा शोध करून ठार मारण्याचा कट करीत आहे.”

  3. हेरोद राजाचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला आणि अशाप्रकारे, “मी इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले!” असे जे प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते, ते भविष्य पूर्ण झाले.

  4. हेरोद मरण पावल्यानंतर, प्रभूच्या दूताने योसेफाला इजिप्तमध्ये पुन्हा स्वप्नात दर्शन दिले,

  5. परंतु यहूदीया प्रांतात हेरोदा ऐवजी त्याचा पुत्र अर्खेलाव राज्य करीत आहे हे त्याला समजले, तेव्हा तिकडे जाण्यास त्याला भीती वाटली. मग स्वप्नात त्यांना अशी सूचना मिळाली म्हणून तिकडे न जाता तो गालील प्रांतात गेला.

  6. आमचा पिता तर अब्राहाम आहे असे आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहामासाठी संतती निर्माण करण्यास समर्थ आहे.

  7. येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला;

  8. आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”

  9. मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”

  10. तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.”

  11. तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे: “तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल, आणि तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.”

  12. तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”

  13. येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”

  14. धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.

  15. धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.

  16. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.

  17. परंतु मी तुम्हाला सांगतो, शपथ वाहू नका. स्वर्गाची नव्हे, कारण ते परमेश्वराचे सिंहासन आहे.

  18. किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे,

  19. अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्‍या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.

  20. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

  21. “तुमच्या नीतिमत्वाचे आचरण लोकांसमोर न करण्याची काळजी घ्या. कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणार्‍या प्रतिफळास तुम्ही मुकाल.

  22. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

  23. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  24. त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते.

  25. “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो,