मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ‘इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात की तुम्हाला ज्या बाबेलच्या राजाने व खाल्डियन लोकांनी वेढा घातला आहे, त्यांच्याशी लढताना मी तुमची शस्त्रे तुमच्याच विरुद्ध करेन. मी तुमच्या शत्रूंना या नगराच्या आत एकत्रित करणार आहे.

  2. माझ्या अतिक्रोध व भयानक कोपामुळे माझा उगारलेला हात व शक्तिशाली भुजा घेऊन मी स्वतःच तुमच्याविरुद्ध लढणार आहे.

  3. या नगरात राहणाऱ्या सर्वांवर—मनुष्य व प्राणी या दोघांवर—मी भयानक मरी पाठवेन आणि ते मरतील.

  4. त्यानंतर याहवेहने ही घोषणा केली, मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी, व मरीमधून वाचलेल्या या नगरातील सर्व लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्यांचे शत्रू, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात त्यांच्या हाती देईन. तो त्यांना तलवारीने ठार करेल; तो त्यांच्यावर कोणतीही दया, करुणा वा कृपा करणार नाही.’

  5. “पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे.

  6. कारण मी या नगराचे भले नाही, तर विध्वंस करण्याचा निर्धार केला आहे, ही याहवेहची घोषणा आहे. हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल आणि तो ते अग्नीने जाळून भस्म करेल.’

  7. “यहूदीयाच्या राजघराण्याला असे म्हण, ‘याहवेहचे वचन ऐका.

  8. दावीदाच्या घराण्याला, याहवेह काय म्हणतात ते ऐका: “ ‘रोज सकाळी योग्य न्यायनिवाडा करा; दुष्टांनी ज्याला लुबाडले आहे अशांना त्यांच्या हातातून सोडवा, नाहीतर माझा क्रोध भडकेल व अग्नीसारखा पेटेल कारण तुम्ही दुष्कर्म केले आहे— हा क्रोधाग्नी कोणीही शांत करू शकणार नाही.

  9. हे यरुशलेमा, मी तुझ्याविरुद्ध आहे, तुम्ही जे या खोर्‍यावर राहता खडकाळ पठारावरील रहिवासी, याहवेह असे म्हणतात; तुम्ही म्हणता, “आमच्याविरुद्ध कोण येईल? आमच्या वस्ती मध्ये कोण प्रवेश करेल?”

  10. याहवेह म्हणतात, तुमच्या कृत्याच्या योग्य शिक्षा मी तुम्हाला करेन. मी तुमच्या अरण्यामध्ये अग्नी पेटवेन तो तुमच्या सभोवती असलेले सर्वकाही जाळून टाकेल.’ ”

  11. याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:

  12. ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.

  13. याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.

  14. परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”

  15. कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले: “जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे, व लबानोनच्या शिखरासारखा आहेस, मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड आणि निर्जन नगरीसारखे करेन.

  16. मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन, प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल, ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील आणि त्या तोडून अग्नीत टाकतील.

  17. “अनेक राष्ट्रातील लोक या शहराजवळून जातील आणि येथील विध्वंस पाहून ते एकमेकांना म्हणतील, ‘याहवेहने हे एवढे भव्य शहर का बरे नष्ट केले?’

  18. आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ”

  19. यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.

  20. तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन, ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’ तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो, गंधसरूची तक्तपोशी करतो आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.

  21. त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.

  22. म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’

  23. तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!

  24. “मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,

  25. आणि तुझा वध करू पाहणार्‍यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.