God
God चा उल्लेख असलेली वचने
मग याहवेहचा आत्मा इफ्ताहावर आला. तो गिलआद व मनश्शेह पार करून गिलआदाच्या मिस्पेह येथे गेला आणि तिथून त्याने अम्मोनी लोकांवर आक्रमण केले.
इफ्ताहाने याहवेहला नवस केला: “जर तुम्ही अम्मोनी लोकांना माझ्या हाती द्याल,
आणि जेव्हा मी अम्मोन्यांकडून सुरक्षित परत येईन, तेव्हा माझ्या घराच्या दारातून जे काही मला भेटायला येईल ते याहवेहचे असेल आणि मी त्याचा होमार्पण म्हणून यज्ञ करेन.”
नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले.
जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”
“माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.
जेव्हा मी हे पहिले तुम्ही मदतीला येत नाही, तेव्हा मी माझ्या जिवावर उदार होऊन अम्मोनी लोकांवर चालून गेलो आणि याहवेहने मला त्यांच्यावर विजय दिला. मग आज तुम्ही आमच्याविरुद्ध लढावयास का आलात?”
पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, म्हणून याहवेहने त्यांना चाळीस वर्षे पलिष्टी लोकांच्या अंमलाखाली ठेवले.
याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील.
कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”
तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही.
परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर होईल.’ ”
तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे तो आम्हास शिकवेल.”
परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता
याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “मी तुझ्या पत्नीला जे सांगितले आहे ते सर्व तिने करावे.
मानोहा याहवेहच्या दूतास म्हणाला, “आम्ही आपणासाठी करडू तयार करेपर्यंत आपण येथेच थांबावे.”
याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.)
नंतर मानोहाने याहवेहच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? म्हणजे तुमचे शब्द खरे ठरल्यानंतर आम्ही तुमचा सत्कार करू.”
याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तू माझे नाव का विचारतो? हे समजण्यापलीकडे आहे.”
मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:
मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले.
जेव्हा याहवेहचा दूत मानोहा आणि त्याच्या पत्नीला परत प्रकट झाला नाही, तेव्हा मानोहाला हे कळले की तो याहवेहचा दूत होता.
“आता आपला मृत्यू निश्चित आहे!” मानोहा त्याच्या पत्नीला म्हणाला. “आम्ही परमेश्वराला पाहिले आहे!”
परंतु त्याची पत्नीने उत्तर दिले, “जर याहवेहला आपल्याला मारून टाकावयाचे असते, तर त्यांनी आपल्या हातांनी होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला या सर्व अद्भुत गोष्ट प्रकट केली नसती वा आपल्याला सांगितलीही नसती.”
मग त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शमशोन ठेवले. तो वाढत गेला आणि याहवेहने त्याला आशीर्वाद दिला,