God
God चा उल्लेख असलेली वचने
परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले,
तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला.
जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!”
परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”
म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.
त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्या अशेरा देवीचा खांब तोडून टाक.
नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्हा अर्पण कर.”
यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.
तेव्हा याहवेहचा आत्मा गिदोनावर आला आणि त्याने रणशिंग फुंकले; अबिएजेरी लोक त्याच्याकडे आले.
गिदोन परमेश्वराला म्हणाला, “जर तुम्ही इस्राएलला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे माझ्या हातांनी वाचवाल—
पाहा, तर आज रात्री खळ्यात मी लोकर ठेवेन आणि सकाळी लोकर तेवढी दवाने ओली असावी, परंतु सभोवतालची जमीन कोरडी असे आढळून आले, तर मी समजेन की तुम्ही इस्राएलला वाचविण्यासाठी मला मदत कराल.”
नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.”
त्या रात्री परमेश्वराने तसेच केले. त्या रात्री लोकर कोरडी राहिली, परंतु जमीन दहिवराने आच्छादून गेली.
याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’
परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.”
म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.”
याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.”
त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे.
त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.”
जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.”
मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ”
तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!”
जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले.
परमेश्वराने ओरेब व जेब मिद्यानी पुढारी तुमच्या हातात दिले. तुमच्या तुलनेने मी काय केले आहे?” असे बोलल्यानंतर त्यांचा त्याच्यावरचा राग शांत झाला.
त्यावर गिदोन म्हणाला, “याहवेह जेव्हा जेबह व सलमुन्नाला माझ्या हाती देतील, तेव्हा मी रानातील काटे व काटेरी झुडपांनी तुमच्या शरीराचे मांस फाडेन.”