मुख्य मजकुरावर जा

Dan

63 वचने · 15 कुटुंब सदस्य

Dan चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.

  2. म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”

  3. दान गोत्रावर: यरोहामाचा पुत्र अजरएल.

  4. त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.

  5. बेन-हदाद आसा राजाशी सहमत झाला व आपल्या सैन्याच्या सेनापतींना इस्राएलच्या नगरांवर हल्ला करण्यास पाठवले. त्यांनी इय्योन, दान, आबेल-माईम आणि नफतालीचे सर्व भांडारशहरे ही जिंकून घेतली.

  6. त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.

  7. दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे.

  8. दान इथून शत्रूच्या घोड्यांचा फुरफुरण्याचा आवाज येतो; घोड्यांच्या मोठ्या किंकाळण्यांनी सर्व भूमीवर थरकाप उडाला आहे. ते भूमी आणि त्यात जे काही आहे, हे नगर आणि जे सर्व इथे राहतात, ते सर्वनाश करण्यासाठी आले आहेत.

  9. आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.

  10. “यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही: “उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत.

  11. दानच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा आशेरचा एक भाग असेल.

  12. पूर्वेची बाजू जी चार हजार पाचशे हात लांब आहे, तिथे तीन द्वारे असतील: योसेफाचे द्वार, बिन्यामीनचे द्वार आणि दानचे द्वार.

  13. जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात; जे म्हणतात, ‘हे दान, तुझ्या दैवतेची शपथ’ किंवा ‘बेअर-शेबाच्या दैवतेची शपथ,’— ते असे पडतील की पुन्हा कधीही उठणार नाहीत.”