मार्क३
Listen to this chapter
0:00
0:00
शब्बाथाच्या दिवशी बरे करणे
१
आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तिथे हात वाळलेला एक मनुष्य होता.
२
काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते.
३
येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.”
४
नंतर येशू त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे?” परंतु ते शांत बसले.
५
त्यांनी सभोवार जमलेल्यांकडे रागाने आपली नजर फिरविली आणि त्यांची कठीण हृदये पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले व त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.
६
यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.
मोठ्या लोकसमुदायाची येशूने सेवा केली
७
इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता.
८
येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते.
९
तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले.
१०
कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते.
११
जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!”
१२
परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका.
बारा प्रेषितांची निवड
१३
येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले.
१४
तेव्हा त्यांनी बारा जणांची निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे
१५
आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.
१६
त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),
१७
जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),
१८
आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी
१९
आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला.
बालजबूलाचा आरोप
२०
येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना.
२१
येशूंच्या कुटुंबीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.”
२२
आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
२३
येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?
२४
जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही.
२५
जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.
२६
सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे.
२७
खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल.
२८
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल,
२९
परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”
३०
असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते.
येशू आपले खरे कुटुंब स्पष्ट करतो
३१
इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले.
३२
त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत.”
३३
यावर त्यांनी म्हटले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
३४
नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत!
३५
जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings
Reading style
Typeface
Font size px
Reading width chars
Options
Study note