Skip to content

Years बद्दल बायबलमधील वचने

27 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

  2. आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.

  3. नोआहच्या आयुष्याच्या सहाशेव्या वर्षात, दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी—त्याच दिवशी पृथ्वीच्या पोटातील सर्व झर्‍यातील पाणीही उफाळून वर आले आणि आकाशाची दारे उघडली.

  4. पृथ्वी पाण्याच्या पुराखाली दीडशे दिवस राहिली.

  5. पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले.

  6. नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले.

  7. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  8. अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला.

  9. मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला.

  10. “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल.

  11. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  12. पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.

  13. इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत.

  14. राज्यातील सर्व यहूद्यांनी हा उत्सव सुरू करण्यास व आपल्या वंशजांनी आणि यहूदी होणार्‍या सर्वांनी न चुकता प्रत्येक वर्षी हे दोन दिवस योग्य वेळी साजरे करण्याचा संकल्प केला.

  15. मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.

  16. कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.

  17. याहवेहच्या कृपेचे वर्ष आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास, आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  18. माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता; आणि ते उद्धार करण्याचे वर्ष आले होते.

  19. त्यांच्यातील एकही जिवंत राहणार नाही. कारण त्यांच्या शिक्षेचे वर्ष येताच मी अनाथोथच्या लोकांवर अरिष्ट आणेन.”

  20. “म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील; त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल आणि तिथे ते पडतील. ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.” असे याहवेह म्हणतात.

  21. तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”

  22. “रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.

  23. धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.

  24. त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.

  25. प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”