मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

82 वचने · 68 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही.

  2. तुमच्यापैकी काही अधम पुरुष निघाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नगरातील लोकांना हे बोलून बहकविले, “चला आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (अशी दैवते ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत),

  3. ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत; त्यांना लाज वाटेल की ते एक विकृत आणि कुटिल पिढी आहेत.

  4. तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन, आणि मग त्यांचा कसा अंत होतो ते पाहीन; कारण ही विकृत पिढी आहे, जी विश्वासयोग्य संतती नाही.

  5. जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल. सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील; पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील. “ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील, आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”

  6. एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.

  7. आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

  8. परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.”

  9. कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता.

  10. आधार नसलेल्या आणि अपरिचित पिलावळी सारखे त्यांना त्यांच्या देशातून हाकलून दिले होते.

  11. तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो; जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.”

  12. धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्‍यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.

  13. याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.

  14. पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.

  15. दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.

  16. पाहा, दुष्कर्म करणारे कसे खाली पडले आहेत— खाली फेकलेले, आता पुन्हा उठू शकणार नाहीत!

  17. दावीदाचे स्तोत्र. दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.

  18. पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील: याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील.

  19. कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.

  20. परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल.

  21. तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील.

  22. याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा. या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना दयामाया दाखवू नका. सेला

  23. कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.

  24. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते.

  25. जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.