Skip to content

Theft बद्दल बायबलमधील वचने

54 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या.

  2. तुम्ही चोरी करू नका.

  3. “जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत.

  4. “एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही.

  5. पण ते जर सूर्योदय झाल्यावर घडले, तर मारणारा रक्तदोषी ठरेल. “ज्याने चोरी केली त्याने खचितच भरपाई करून द्यावी, पण त्याच्याकडे काहीही नसले, तर त्याला चोरीची भरपाई म्हणून विकून टाकावे.

  6. त्याने चोरलेले बैल, गाढव किंवा मेंढरू त्याच्याजवळ जिवंत सापडले; तर त्याने त्याची दुपटीने भरपाई करावी.

  7. “जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्‍याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी.

  8. “कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्‍याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी.

  9. “जर कोणी चांदी किंवा सामान सुरक्षित राहावे म्हणून आपल्या शेजार्‍याकडे ठेवले आणि त्याची चोरी झाली, जर चोराला पकडले तर त्या चोराने त्या सामानाची दुप्पट भरपाई करून द्यावी.

  10. पण जर चोर सापडला नाही तर घरमालकाने न्यायाधीशासमोर हजर व्हावे आणि शेजार्‍याच्या सामानावर त्याने हात टाकला नाही हे सिद्ध करावे.

  11. “ ‘तुम्ही कोणाला फसवू नये किंवा तुमच्या शेजार्‍याला लुबाडू नये. “ ‘मजुरांची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नये.

  12. लुटीमध्ये मी एक सुंदर शिनारी झगा आणि दोनशे शेकेल चांदी, पन्नास शेकेल सोन्याची लगड या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्या मला इतक्या हव्याशा वाटल्या की, मी त्या घेतल्या आणि त्या वस्तू माझ्या डेर्‍यात खाली जमिनीत पुरून ठेवलेल्या आहेत. झगा आणि सोने यांच्याहून चांदी सर्वात खाली पुरलेली आहे.”

  13. शेखेमाच्या नागरिकांनी त्याच्याविरुद्ध डोंगराच्या माथ्यावर वाटेवर दबा धरण्यास लोक ठेवले आणि त्या वाटेने जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला ते लुबाडू लागले आणि हे कोणीतरी अबीमेलेखाचा सांगितले.

  14. तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!”

  15. हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात, आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात— ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.

  16. दिवस मावळला म्हणजे हत्यारा सज्ज होतो, गरीब आणि गरजवंतांना तो ठार करतो, आणि रात्रीच्या वेळी चोरासारखी चोरी करतो.

  17. तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता.

  18. तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.

  19. दुष्टांनी मला दोरखंडाने बांधले तरीही, मी तुमचे नियम विसरणार नाही.

  20. दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात.

  21. श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.

  22. चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत.

  23. तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.

  24. गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.

  25. “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते, तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे— ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.