Skip to content

Theft बद्दल बायबलमधील वचने

54 वचने · 34 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. चोरी करणार्‍यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.

  2. पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.

  3. जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये.

  4. तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्‍या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.