मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Gad बद्दल बायबलमधील वचने

93 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.

  2. त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.

  3. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.

  4. गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते.

  5. एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा,

  6. मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा,

  7. अत्तय सहावा, एलीएल सातवा,

  8. योहानान आठवा, एलजाबाद नववा,

  9. यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा.

  10. हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा.

  11. वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्‍यांत राहणार्‍या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.

  12. “अहो दिबोन कन्येचे निवासी, आपल्या वैभवावरून खाली उतरा आणि शुष्क भूमीवर येऊन बसा, कारण जे मोआब भूमीचा विनाशक तुमच्याविरुद्ध येत आहेत आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.

  13. अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’

  14. मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे.

  15. पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ यांनाही शिक्षा मिळाली आहे.

  16. दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,

  17. किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन

  18. करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.