मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Gad बद्दल बायबलमधील वचने: Spoiled the Hagarites

5 वचने · 25 पैलू

Spoiled the Hagarites बद्दल वचने

  1. रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे.

  2. त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.

  3. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.

  4. त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.

  5. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.