Skip to content

Summer बद्दल बायबलमधील वचने

28 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  2. मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच,

  3. तो गेल्यानंतर सेवक आले आणि त्यांना वरच्या खोलीचे दरवाजे कुलूप लावून बंद असल्याचे दिसले. ते म्हणाले, “महाराज राजवाड्याच्या आतील खोलीत आराम करण्यास गेले असावे.”

  4. जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.

  5. राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”

  6. रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला

  7. पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.

  8. अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो!

  9. तिला कोणीही अधिकारी, मुकादम किंवा अधिपती नाही,

  10. तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते.

  11. जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.

  12. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही.

  13. मुंग्या, दुर्बल प्राणी आहेत, तरीही उन्हाळ्यात ते त्यांचे धान्य साठवून ठेवतात;

  14. म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.

  15. ते सुकत जाणारे फूल, सुपीक खोऱ्याच्या टोकावर बसविलेले, त्याचे तेजस्वी सौंदर्य, कापणीच्या आधी पिकलेल्या अंजिरांसारखे होईल— लोक त्यांना पाहताक्षणीच त्यांना हातात घेतात, व त्यांना गिळंकृत करतात.

  16. “हंगाम संपला, उन्हाळा सरला आणि तरीही आमचे तारण झाले नाही.”

  17. ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

  18. मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”

  19. तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.

  20. जसे याजेर शोक करतो, तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो. तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत, त्या याजेरपर्यंत पोहोचतात; संहार करणाऱ्याने तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.

  21. मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.

  22. मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.

  23. सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.

  24. “आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”

  25. काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.