Skip to content

Song बद्दल बायबलमधील वचने

50 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत!

  2. “गथमध्ये हे सांगू नका, अष्कलोनच्या रस्त्यांवर याची घोषणा करू नका, नाहीतर पलिष्ट्यांच्या कन्या हर्ष पावतील, बेसुंत्यांच्या कन्या आनंद करतील.

  3. “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही.

  4. “वध केलेल्यांच्या रक्तापासून शूरवीरांच्या मांसापासून योनाथानचा बाण मागे फिरला नाही, शौलाची तलवार असमाधानाने परत आली नाही.

  5. शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.

  6. “अहो, इस्राएलच्या कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली.

  7. “हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे.

  8. योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते!

  9. “पाहा, बलवान कसे पडले आहेत! युद्धाची शस्त्रे नष्ट झाली आहेत!”

  10. शलोमोनने तीन हजार नीतिसूत्रे आणि एक हजार पाच गीते रचली.

  11. त्यांच्यापुढे नवीन गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.

  12. त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.

  13. मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.

  14. मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.

  15. आत्म्याने प्रेरित स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते गाऊन एकमेकांशी बोला. भजने गाऊन व संगीताद्वारे तुमच्या मनापासून प्रभूची स्तुती करा.

  16. स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.

  17. जरी हे सर्व तुम्हाला आधी माहीत आहे, तरी तुम्हाला आठवण करून देतो की प्रभूने त्यांच्या लोकांना इजिप्तमधून सोडविले, परंतु नंतर त्यांच्यावर विश्वास न ठेवणार्‍यांचा त्यांनी नाश केला.

  18. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,

  19. तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

  20. मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता.

  21. लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.

  22. कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते.

  23. असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत.

  24. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  25. हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”