Skip to content

Shewbread बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनवा; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच असावा.

  2. त्याला शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे आणि त्याभोवती सोन्याचा काठ करावा.

  3. मेजाच्या सभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा.

  4. मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या कराव्‍यात आणि त्या चार पायांच्या चार कोपर्‍यांवर लावाव्या.

  5. मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ असाव्यात.

  6. दांडे बाभळीच्या लाकडाचे असावेत, त्यांना सोन्याचे आवरण द्यावे आणि मेज वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग करावा.

  7. आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील ताटे, पात्रे, तसेच त्याचे कलश व वाट्या हे शुद्ध सोन्याचे असावे.

  8. त्या मेजावर माझ्यासमोर समक्षतेची भाकर नेहमी ठेवलेली असावी.

  9. मोशेने सभामंडपामध्ये, निवासमंडपाच्या उत्तर दिशेला पडद्याच्या बाहेर मेज ठेवला

  10. व मोशेने त्यावर याहवेहसमोर भाकर ठेवली, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

  11. “सपीठ घ्यावे आणि त्याच्या बारा भाकरी तयार कराव्या, प्रत्येक भाकरीसाठी दोन दशांश एफा वापरावा.

  12. त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात.

  13. प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी.

  14. ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे.

  15. या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”

  16. “समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.

  17. परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.”

  18. दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!”

  19. तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

  20. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.

  21. त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या.

  22. आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.

  23. “प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची;

  24. समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे; आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.

  25. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?