Skip to content

Shewbread बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

  2. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का?

  3. महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  4. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  5. दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  6. मीच जीवनाची भाकर आहे.

  7. या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले.

  8. कारण भाकर एक आहे, आम्ही पुष्कळजण असलो तरी एक शरीर आहोत, आपण सर्वजण एकाच भाकरीचे सहभागी आहोत.

  9. एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.