मुख्य मजकुरावर जा

Shewbread बद्दल बायबलमधील वचने: Unlawfully eaten by David

7 वचने · 26 पैलू

Unlawfully eaten by David बद्दल वचने

  1. तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे.

  2. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  3. तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या.

  4. येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का?

  5. महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  6. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

  7. दावीद परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्याच्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”