Skip to content

Selfishness बद्दल बायबलमधील वचने

79 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”

  2. “ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.

  3. मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  4. त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.

  5. जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”

  6. मग हामान आत आल्यावर, राजाने त्याला विचारले, “जर एखाद्या मनुष्याला बहुमान देण्यात राजाला संतोष वाटत असल्यास काय करावयाला हवे?” आता हामानाने स्वतःबद्दल विचार केला, “राजाच्या मर्जीत सन्मानास योग्य असणारा माझ्याशिवाय दुसरा कोण असेल?”

  7. सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय?

  8. आपण त्याचे घरदार व जे सर्वकाही त्याचे आहे त्याभोवती कुंपण घातलेले नाही का? तुम्ही त्याच्या हाताचे श्रम आशीर्वादित केले आहेत व देशात त्याचे कळप आणि गुरे वृद्धी पावत आहेत.

  9. परंतु आता आपला हात पुढे करून जे सर्वकाही त्याचे आहे ते हिरावून घ्या आणि मग पाहा, आपल्या तोंडावर तो आपल्याला खचितच शाप देईल.”

  10. माझे प्रियजन आणि माझे मित्र माझ्या आजारामुळे मजपासून दूर राहतात; माझे कुटुंबीय माझ्यापासून दूर उभे राहतात.

  11. जो धान्य अडवून ठेवतो, त्याला लोक शाप देतात, परंतु जो विकण्यास इच्छुक असतो, त्याच्यासाठी लोक आशीर्वादाची प्रार्थना करतात.

  12. दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्‍याची बाजू योग्य वाटते.

  13. ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्‍या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव.

  14. जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का?

  15. जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्‍यांवर पुष्कळ शाप येतील.

  16. ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; त्यांची तृप्ती कधीही होत नाही. ते असमंजस मेंढपाळ आहेत; ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.

  17. चांगला चारा तुम्हाला खायला मिळाला ते तुम्हाला पुरेसे नाही काय? तुमचे बाकीचे कुरण तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवावे काय? तुम्हाला पिण्यास स्वच्छ पाणी मिळाले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? बाकीचे पाणी तुम्ही तुमच्या पायांनी गढूळ करावे काय?

  18. तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”

  19. “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”

  20. “तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात.

  21. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे.

  22. आणि आता देखील तुम्ही मेजवान्या करता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी करीत नाही का?

  23. “अहा, तुमच्यापैकी कोणीतरी मंदिराची दारे बंद करावी, म्हणजे तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक धूप जाळणार नाही! मी तुमच्यावर मुळीच प्रसन्न नाही, आणि तुमच्या हातातील अर्पणांचा स्वीकार करणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

  24. येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”

  25. पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.