Skip to content

Secret बद्दल बायबलमधील वचने

23 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. रहस्यमय बाबी याहवेह आमच्या परमेश्वराच्या आहेत; परंतु त्यांनी ज्यागोष्टी उघड रीतीने सांगितल्या, त्या आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी आहेत, यासाठी की आपण या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांचे पालन करावे.

  2. आणि जेव्हा त्यांच्यावर अनेक संकटे व अरिष्टे येतील, तेव्हा हे गीत त्यांच्याविरुद्ध साक्ष असे ठरेल, कारण त्यांचे वंशज हे गीत विसरू शकणार नाही. या वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वीच या लोकांची प्रवृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे.”

  3. परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”

  4. “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.

  5. “ ‘परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस.

  6. याहवेहचे भय धरणार्‍यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात.

  7. तर परमेश्वराला ते समजले नसते काय? कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.

  8. तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता; तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.

  9. जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,

  10. कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल, ती चांगली असो किंवा वाईट, त्याचा परमेश्वर न्याय करतील.

  11. परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:

  12. राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”

  13. सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही.

  14. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.

  15. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  16. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.

  17. असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही.

  18. “कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.

  19. कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही.

  20. हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील.

  21. यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.

  22. कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.

  23. संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.