Skip to content

Satan बद्दल बायबलमधील वचने

135 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.

  2. सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल,

  3. हुमनाय व आलेक्सांद्र हे त्यांच्यामध्ये आहेत; त्यांनी ईश्वराची निंदा करू नये हे शिकावे, म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे.

  4. अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल.

  5. तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.

  6. कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.

  7. सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कैद करून ठेवले आहे. ते शुद्धीवर येतील आणि सैतानाच्या सापळ्यातून सुटतील.

  8. आणि ज्याअर्थी लेकरे रक्तमांसाची आहेत, त्याअर्थी तेही रक्तमांसाचे भागीदार झाले; यासाठी की त्यांच्या मरणाद्वारे सैतानाकडे जे मृत्यूचे सामर्थ्य होते, ते त्याचे सामर्थ्य मोडून काढावे.

  9. तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल;

  10. सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो.

  11. विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.

  12. कारण जर परमेश्वराने पाप करणार्‍या देवदूतांना राखले नाही, परंतु नरकात पाठविले, निबिड काळोखाच्या बंधनात न्यायासाठी अटकेत ठेवले.

  13. पित्यांनो मी तुम्हाला लिहित आहे, कारण जे आरंभापासून आहेत त्यांना तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहित आहे, कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.

  14. जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले.

  15. यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत.

  16. आपण काईनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाची कृत्ये वाईट होत्या आणि त्याच्या भावाची कृत्ये नीतियुक्त होती.

  17. आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही.

  18. आणि ज्या दूतांनी आपल्या अधिकारांचे पद न राखता आपले योग्य स्थान सोडले त्यांना त्यांनी अंधकारात, अनंतकाळच्या बंधनात मोठ्या न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले आहे.

  19. परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”

  20. मला तुमचे दुःख आणि दारिद्र्य ठाऊक आहे, तरीपण तुम्ही धनवान आहात! आणि जे म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत तर सैतानाचे सभास्थान आहेत, अशा लोकांनी केलेली निंदा मी जाणतो.

  21. तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.

  22. तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.

  23. थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा.

  24. जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील.

  25. अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.