Skip to content

Reptiles बद्दल बायबलमधील वचने

37 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,

  2. ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.

  3. “मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”

  4. म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली.

  5. किंवा मासा मागितला, तर साप देईल?

  6. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे.

  7. तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती.

  8. मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.”

  9. “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.”

  10. तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला.

  11. आणि मग त्यांनी अविनाशी परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल करून, स्वतःसाठी नश्वर मानव, पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी यांच्या मूर्ती बनविल्या.

  12. नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.