Reptiles बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले.
परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे.
मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.”
तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन.
जमिनीवर सरपटणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,
घोरपड, घुशी, पाल, मगर, गोगलगाय व गुहिर्या सरडा.
जमिनीवर सरपटणार्यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
त्याचप्रमाणे जो कोणी त्या प्राण्याचे मांस खाईल किंवा त्याचे मृतदेह वाहून नेईल, त्याने आपली वस्त्रे धुवावीत; तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत. ते खाऊ नयेत.
जे पोटावर सरपटतात, चार पायांवर खुरडत चालतात वा ज्यांना अनेक पाय असतात असे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते अशुद्ध आहेत.
झुंडीने राहणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करून तुम्ही अशुद्ध होऊ नये. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका.
म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये,
अथवा जमिनीवर रांगणार्या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.
विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.
त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.
लबानोनातील गंधसरूपासून भिंतीतून उगविणार्या एजोबापर्यंत वनस्पती जीवनाविषयी तो बोलला. पशू व पक्षी, सरपटणारे जंतू व मासे याबद्दलही त्याने वर्णन केले.
केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्या सर्पाला विंधले आहे.
मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.
त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्या नागसर्पांसारखे आहेत,
गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या; सूर्याचे दर्शन न घेता मरण पावणार्या, अकाली जन्मणार्या गर्भासारखे ते होवोत.
तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील.
हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,
शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.
“जळूला दोन मुली आहेत. ‘दे! दे!’ असे त्या ओरडतात. “अशा तीन गोष्टी आहेत त्या कधीही समाधानी नसतात, ‘पुरे झाले!’ असे कधीही न बोलणार्या चार गोष्टी आहेत:
लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.