मुख्य मजकुरावर जा

Rending of Garments बद्दल बायबलमधील वचने: A token of affliction

27 वचने · 3 पैलू

A token of affliction बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा रऊबेन त्या विहिरीजवळ परत आला आणि योसेफ विहिरीत नाही हे पाहून त्याने आपली वस्त्रे फाडली.

  2. यानंतर याकोबाने आपली वस्त्रे फाडली आणि गोणपाट नेसून त्याने मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.

  3. हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.

  4. नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली

  5. जेव्हा त्यांना तिला पाहिले, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो आकांत केला, “हाय, हाय, माझ्या कन्ये! तू मला मातीत मिळविले आहेस आणि तू माझ्या शोकाचे कारण झाली आहेस! कारण मी याहवेहला नवस केला आहे, जो आता मला मागे घेता येत नाही.”

  6. तिसर्‍या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले.

  7. तेव्हा दावीदाने आणि त्याच्या बरोबरच्या माणसांनी आपली वस्त्रे धरली व फाडली.

  8. नंतर दावीद योआबाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांना म्हणाला, “तुमची वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरसमोर शोक करत चला.” दावीद राजा स्वतः तिरडीमागे चालला.

  9. तामारने तिच्या डोक्यावर राख घातली आणि जो पायघोळ झगा तिने घातला होता तो तिने फाडला. तिने तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मोठ्याने रडत ती निघून गेली.

  10. तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले.

  11. दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.

  12. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्याला पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.

  13. इस्राएलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली आहेत, असे जेव्हा परमेश्वरचा मनुष्य अलीशाने ऐकले, तेव्हा त्याने राजाला हा निरोप पाठविला: “तुम्ही आपली वस्त्रे का फाडली? त्या व्यक्तीला माझ्याकडे पाठवून द्या आणि त्याला समजून येईल की इस्राएलमध्ये संदेष्टा आहे.”

  14. जेव्हा राजाने स्त्रीचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने आपला अंगरखा फाडला. त्याला तटावरून फिरत असता लोकांनी पाहिले आणि त्यांच्या नजरेस आले की त्याच्या अंगरख्या खाली त्याने गोणपाट गुंडाळलेले आहे.

  15. तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”

  16. जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला.

  17. जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली.

  18. कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.

  19. जेव्हा मी हे ऐकले, तेव्हा मी माझा अंगरखा फाडला, डोक्याचे व दाढीचे केस उपटले आणि अत्यंत भयभीत मनस्थितीत मी खाली बसलो.

  20. सरतेशेवटी, सायंकाळच्या होमार्पणाची वेळ झाल्यावर अत्यंत गोंधळलेल्या, माझा झगा व अंगरखा फाटलेल्या स्थितीतच मी गुडघे टेकले आणि याहवेह माझ्या परमेश्वराकडे हात उंचावले.

  21. हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली

  22. त्यांनी इय्योबाला दुरून पाहिले, तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत; मग ते मोठ्याने रडू लागले, त्यांनी आपले झगे फाडले आणि आपल्या डोक्यावर धूळ घातली.

  23. यानंतर हिल्कियाहचा पुत्र, राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  24. जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला.

  25. याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती.