मुख्य मजकुरावर जा

Purifications बद्दल बायबलमधील वचने: Of individuals who were ceremonially unclean

24 वचने · 25 पैलू

Of individuals who were ceremonially unclean बद्दल वचने

  1. इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: जेव्हा कोणाही माणसाच्या शरीरातून स्राव होत असेल, तर अशा प्रकारचा स्त्राव हा अशुद्ध आहे.

  2. त्याचे शरीर सतत स्राव बाहेर टाकीत असले किंवा अडवून ठेवीत असले, तरी तो मनुष्य अशुद्ध आहे. या स्रावामुळे तो मनुष्य अशुद्ध होतो:

  3. ज्या बिछान्यावर तो झोपेल आणि ज्या बैठकीवर तो बसेल ती अशुद्ध होईल.

  4. जे कोणी अशा माणसाच्या अंथरुणाला स्पर्श करतील त्यांनी त्यांची वस्त्रे धुवावीत आणि स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत ते अशुद्ध राहतील.

  5. स्रावामुळे अशुद्ध झालेला मनुष्य ज्या बैठकीवर बसला असेल त्या बैठकीवर जो कोणी बसेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. त्याने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे.

  6. जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  7. ज्या कोणा शुद्ध व्यक्तीवर असा मनुष्य थुंकेल, त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  8. ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय,

  9. आणि जो कोणी अशा माणसाच्या अंगाखालील वस्तूला स्पर्श करेल किंवा ती उचलेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  10. हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  11. “असा मनुष्य ज्या मातीच्या पात्राला स्पर्श करेल ते अवश्य फोडून टाकावे आणि कोणत्याही लाकडाच्या भांड्याला त्याचा स्पर्श झाल्यास ते पाण्याने धुऊन घ्यावे.

  12. “स्राव थांबल्यावर त्याने आपली वस्त्रे धुऊन, सात दिवसांच्या शुद्ध होण्याच्या विधीची सुरुवात करावी. त्याने आपली वस्त्रे धुवावी आणि वाहत्या पाण्यात स्नान करून शुद्ध व्हावे.

  13. “ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल.

  14. “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल,

  15. किंवा जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची अशुद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्पर्श केला तर तो अशुद्ध होईल.

  16. अशा कोणालाही त्या व्यक्तीने स्पर्श केला तर तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील आणि पाण्याने स्नान केल्याशिवाय पवित्र अर्पणांतील अन्न खाऊ नये.

  17. सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.

  18. त्यानंतर याजकाने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी. मग त्याने छावणीत यावे, परंतु विधीनुसार संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.

  19. जो पुरुष ती कालवड जाळतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने आंघोळ करावी आणि त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

  20. “शुद्ध असलेल्या एका पुरुषाने कालवडीची राख गोळा करावी व छावणीबाहेर विधीनुसार शुद्ध असलेल्या ठिकाणी ठेवावी. ही राख इस्राएली समाजाने शुद्धीकरणाच्या पाण्यामध्ये वापरावी; ते पापक्षालनासाठी आहे.

  21. जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

  22. “जो कोणी मानवी मृतदेहाला स्पर्श करतो, त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे.

  23. त्यांनी तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी स्वतःला पाण्याने शुद्ध करावे; मग ते शुद्ध होतील. पण तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी त्यांनी स्वतःला शुद्ध केले नाही, तर ते अशुद्धच असतील.

  24. हा त्यांच्यासाठी कायमचा नियम आहे. “जो मनुष्य शुद्धतेचे पाणी शिंपडतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावीत आणि जो कोणी शुद्धतेच्या पाण्याला स्पर्श करतो तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.