मुख्य मजकुरावर जा

Prisoners बद्दल बायबलमधील वचने

323 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?” त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”

  2. येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे.

  3. जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,” हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

  4. तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.

  5. येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”

  6. मग यहूदी अधिकार्‍यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले.

  7. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले.

  8. याच कयफाने यहूदी पुढार्‍यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे.

  9. शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला.

  10. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्‍या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले.

  11. मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”

  12. थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.

  13. दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.

  14. येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही.

  15. मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहीतच असेल.”

  16. येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्‍या अधिकार्‍यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.

  17. येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”

  18. मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.

  19. दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”

  20. परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?”

  21. पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.

  22. मग यहूदी पुढार्‍यांनी येशूंना कयफाकडून रोमी राज्यपालाच्या राजवाड्यात नेले. तोपर्यंत पहाट झाली होती आणि आपण नियमशास्त्रानुसार अशुद्ध होऊ नये आणि आपल्याला वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः राजवाड्यात गेले नाहीत.

  23. तेव्हा पिलात त्यांच्याकडे बाहेर आला आणि त्याने त्यांना विचारले, “या मनुष्याविरुद्ध तुमचे काय आरोप आहेत?”

  24. पिलाताला उलट निरोप देत ते म्हणाले, “तो गुन्हेगार नसता तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केलेच नसते!”

  25. पिलात त्यांना म्हणाला, “त्याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” ते विरोध करून म्हणाले, “मृत्युदंड देण्याचा अधिकार आम्हाला नाही.”