Skip to content

Prisoners बद्दल बायबलमधील वचने

323 वचने · 22 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जसा बैल कापणार्‍याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्‍यांच्या फासात पाय टाकते

  2. सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी याहवेहने माझा अभिषेक केला आहे. भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी, कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

  3. ‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे.

  4. महाराज, माझे स्वामी, कृपया माझे ऐका. माझी विनंती तुमच्यापुढे ठेऊ द्या: मला परत त्या योनाथान चिटणीसाच्या घरात पाठवू नका, नाहीतर मी तिथे मरेन.”

  5. त्यावर यिर्मयाहला अंधारकोठडीत पाठवू नये, तर त्याऐवजी राजवाड्यातील तुरुंगात ठेवावे, आणि शहरात भाकरीचा पुरवठा संपेपर्यंत, त्याला रोज एक ताजी भाकर देण्यात यावी, असा सिद्कीयाह राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे यिर्मयाहला राजवाड्यातील पहारेकरांच्या अंगणात ठेवण्यात आले.

  6. मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.

  7. यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.

  8. एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला,

  9. “महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”

  10. मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.”

  11. तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले.

  12. कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्‍या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर

  13. यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला.

  14. एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.”

  15. त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.”

  16. तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हाती तुला देणार नाही.”

  17. मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल.

  18. परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”

  19. यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”

  20. यिर्मयाहने उत्तर दिले, “ते तुम्हाला त्यांच्या हवाली करणार नाही. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळा व मी काय सांगतो ते करा. तर ते तुम्हाला हितकारक ठरेल आणि तुमचा जीव वाचेल.

  21. मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे:

  22. तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’

  23. “तुमच्या सर्व स्त्रिया व मुले यांना बाबिलोनच्या लोकांच्या हवाली केले जाईल, आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाही. बाबिलोनचा राजा तुम्हाला पकडेल आणि हे शहर जळून खाक होईल.”

  24. मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल.

  25. मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्‍यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली,