Skip to content

Presumption बद्दल बायबलमधील वचने

96 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”

  2. यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”

  3. ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?

  4. आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”

  5. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबाह असे ठेवले; कारण इस्राएली लोकांनी भांडण केले आणि याहवेह आमच्यामध्ये आहेत की नाहीत? असे म्हणून याहवेहची परीक्षा घेतली.

  6. जरी त्यांनी डोंगराळ प्रदेशाच्या उंच शिखरापर्यंत जाण्याची धिटाई केली, तरी मोशे किंवा याहवेहच्या कराराचा कोश छावणीतून हलले नाहीत.

  7. “ ‘परंतु जे कोणीही मुद्दाम पाप करतात, ते स्वदेशी असो किंवा परदेशी, ते याहवेहविषयी दुर्भाषण करतात, त्यांचे इस्राएली लोकांतून उच्छेदन करावे.

  8. ते एकजूट होऊन मोशे व अहरोन यांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, “तुमचे आता फार झाले आहे! सर्व समुदाय व त्यातील प्रत्येकजण पवित्र आहे आणि याहवेह त्यांच्याबरोबर आहेत. मग तुम्ही स्वतःला याहवेहच्या मंडळीपेक्षा उच्च का मानता?”

  9. आणि उद्या त्यात जळते निखारे व धूप टाकून ती याहवेहपुढे ठेवा. ज्याला याहवेह निवडतील तोच पुरुष पवित्र ठरेल. लेवींच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले आहे!”

  10. पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”

  11. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”

  12. मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.

  13. तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.

  14. जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील.

  15. याहवेह अशा लोकांना क्षमा करण्यास कधीही तयार होणार नाहीत; त्यांचा कोप व क्रोधाग्नी त्यांच्याविरुद्ध भडकेल. या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्यांच्यावर कोसळतील आणि याहवेह त्यांचे नाव देखील या आकाशाच्या खालून नामशेष करून टाकतील.

  16. परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.

  17. जेव्हा ते नाकोनच्या खळ्याजवळ आले तेव्हा बैल अडखळले आणि परमेश्वराचा कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला.

  18. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  19. तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले.

  20. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  21. तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”

  22. परंतु उज्जीयाह सामर्थ्यवान झाल्यावर त्याचा गर्विष्ठपणा त्याला नाशाकडे घेऊन गेला. तो त्याचे परमेश्वर याहवेह यांच्याबरोबर अविश्वासू झाला आणि त्याने धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला.

  23. “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

  24. माझ्या आधी या जागेवर काम करणाऱ्यांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला त्यांच्या सर्व दैवतांपैकी कोणीतरी त्याच्या लोकांना माझ्यापासून वाचवू शकले का? तर मग तुमचे दैवत तुम्हाला माझ्या हातून कसे बरे सोडवेल?

  25. कारण परमेश्वराकडे तो आपली मूठ फिरवितो आणि सर्वसमर्थ्‍या विरुद्ध स्वतःची बढाई मिरवतो,