Skip to content

Old Age बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. एखाद्या व्यक्तीला शंभर लेकरे असतील आणि तो दीर्घायुषी जगला; तरी तो आपल्या समृद्धीचा आनंद उपभोगू शकत नसेल आणि त्याला योग्य रीतीने मूठमाती मिळत नाही, तर मी असे म्हणतो की, त्याच्यापेक्षा मृत जन्मलेला गर्भ बरा.

  2. जरी तो हजार किंवा दोन हजार वर्षे जगला व त्याला संपत्तीसुखाचा आनंद लाभला नाही. सर्वजण एकाच ठिकाणी जात नाही काय?

  3. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर, आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल, “मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—

  4. जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत;

  5. जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्‍या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्‍यांची नजर अंधुक होईल;

  6. जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील आणि जात्याचा आवाज मंद होईल; जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील, परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;

  7. जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते; जेव्हा बदामाची झाडे फुलतात आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही. तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.

  8. आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्‍यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,

  9. आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी, आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.

  10. वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल. मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन; मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.

  11. आणि चौर्‍याऐंशी वर्षापर्यंत विधवा होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली.

  12. वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.

  13. त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्‍या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्‍या असाव्या;

  14. तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.