मुख्य मजकुरावर जा

Offerings बद्दल बायबलमधील वचने

433 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले,

  2. तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्‍हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे.

  3. दोष असलेला कोणताही प्राणी अर्पण करू नये, कारण ते तुमच्यावतीने मान्य केले जाणार नाहीत.

  4. याहवेहसाठी कोणी स्वतःच्या गुरांतून किंवा शेरडामेंढरांतून शपथपूर्तीचे किंवा स्वखुशीचे शांत्यर्पण करेल, तर ते मान्य होण्यासाठी ते निर्दोष प्राण्याचेच असावे.

  5. याहवेहला आंधळा, हाड तुटलेला, लुळा किंवा अंगावर मस, इसब अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी अर्पण करू नका. यापैकी काहीही वेदीवर याहवेहला हवन म्हणून अर्पण ठेऊ नका.

  6. तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही.

  7. ज्या प्राण्याचे अंडकोश ठेचलेले किंवा चिरडलेले किंवा फाटलेले किंवा कापलेले असेल, त्याचे अर्पण याहवेहला कधीही करू नये. तुमच्या स्वतःच्या देशात असे करू नका.

  8. आणि तुम्ही अशा प्रकारचे प्राणी परराष्ट्रीयांकडून घेऊ नयेत आणि तुमच्या परमेश्वरासाठी अन्नार्पण करू नये. ते तुमच्यावतीने स्वीकारले जाणार नाहीत, कारण ते विकृत आहेत आणि त्यांच्यात दोष आहेत.’ ”

  9. “वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल.

  10. “ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.

  11. त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा.

  12. या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्‍हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण.

  13. मग याजकाने पापार्पणासाठी एक बोकड व शांत्यर्पणासाठी एक वर्षांचे दोन मेंढे अर्पण करावे.

  14. ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)

  15. जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे.

  16. जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल.

  17. “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  18. तर त्याने आपल्या पत्नीला याजकाकडे न्यावे. त्याने तिच्या वतीने सोबत एक एफाचा दहावा भाग जवाचे पीठ आणावे. त्याने त्यावर जैतुनाचे तेल ओतू नये किंवा त्यावर धूप ठेवू नये, कारण हे मत्सरासाठी केलेले अन्नार्पण आहे, अपराधाची आठवण देणारे स्मरणाचे अर्पण आहे.

  19. त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.

  20. याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्‍हाचा यज्ञ करावा.

  21. मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

  22. त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

  23. याहवेहने मोशेला म्हटले,

  24. “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”

  25. तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.