मुख्य मजकुरावर जा

Offerings बद्दल बायबलमधील वचने

433 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

  2. आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

  3. कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.

  4. जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

  5. कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

  6. पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

  7. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  8. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.

  9. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

  10. पापार्पणासाठी एक बोकड;

  11. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  12. दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.

  13. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  14. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  15. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  16. पापार्पणासाठी एक बोकड;

  17. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  18. तिसर्‍या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.

  19. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  20. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  21. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  22. पापार्पणासाठी एक बोकड;

  23. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.

  24. चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

  25. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;