मुख्य मजकुरावर जा

Offerings बद्दल बायबलमधील वचने

433 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा.

  2. “नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.”

  3. शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.

  4. पवित्र वस्तू दूषित करून त्यांनी जे पाप केले त्याची ते भरपाई करतील. त्यांनी भरपाईची रक्कम देऊन वर वीस टक्के अधिक दंड द्यावा. त्यांनी दोषार्पणाचा एक मेंढा याजकाकडे आणावा आणि याजक त्यांच्यासाठी तो मेंढा अर्पून प्रायश्चित्त करेल व त्यांची क्षमा होईल.

  5. “अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.

  6. त्यांनी निर्दोष मेंढा याजकाकडे न्यावा, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा, म्हणजे याजक तो मेंढा अर्पून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त करेल, आणि अजाणतेने घडलेल्या पापाबद्दल त्यांची क्षमा होईल.

  7. हे दोषार्पण आहे, याहवेहविरुद्ध चुकीची गोष्ट केल्याने ते दोषी ठरले आहेत.”

  8. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

  9. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.

  10. “दोषार्पण जे परमपवित्र आहे त्यासंबंधी जे नियम आहेत ते हे:

  11. “याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:

  12. “उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात.

  13. उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे.

  14. या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल.

  15. उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.

  16. “परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्‍या दिवशी खाण्यास हरकत नाही.

  17. अर्पणातील काही मांस तिसर्‍या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे.

  18. शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.

  19. त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.

  20. मग इस्राएली लोकांना सांग: तुम्ही तुमच्या पापार्पणासाठी एक बोकड व होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू निवडून घ्यावे. ही दोन्ही एका वर्षांची असून व्यंग नसलेली असावीत,

  21. आणि याहवेहसमोर शांत्यर्पणाचे बली म्हणून एक गोर्‍हा आणि एक मेंढा व अन्नार्पणासाठी तेल मिसळलेले अन्नबली आणावे. कारण याहवेह आज तुम्हाला दर्शन देणार आहेत.”

  22. मग लोकांनी आणलेली अर्पणे अहरोनाने अर्पण केली. लोकांसाठी पापार्पण म्हणून आणलेल्या पापबलीच्या बोकडाचा जसा वध केला, तसाच या बोकडाचाही वध केला.

  23. नंतर त्याने होमार्पण आणले आणि सूचना दिल्याप्रमाणे त्याचे अर्पण केले.

  24. मग त्याने सकाळच्या होमार्पणाबरोबर अन्नार्पणही सादर केले व त्यातील मूठभर धान्य वेदीवर जाळून टाकले.

  25. यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.