- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Offerings बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे.
त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे.
याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे.
“ ‘जर तुमचे अर्पण हे शांत्यर्पण असेल आणि तुम्ही कळपातील नर किंवा मादी प्राण्याचे अर्पण करीत असाल, तुम्ही निर्दोष असा प्राणी याहवेहसमोर आणावा.
तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे.
शांत्यर्पणातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण आणावे: अंतर्गत अवयव आणि त्यांना जोडून असलेली सर्व चरबी,
कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल.
नंतर अहरोनाच्या पुत्रांनी जळत्या लाकडावर असलेल्या होमार्पणावरील वेदीवर त्याचे हवन करावे. हे अन्नार्पण आहे, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
“ ‘परंतु शांत्यर्पणाचे अर्पण म्हणून शेरडामेंढरांतील नर किंवा मादी यांचे याहवेहला अर्पण करावयाचे असेल तर तो पशू निर्दोष असावा.
जर तुम्ही कोकर्याचे अर्पण करीत असाल तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,
तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील.
शांत्यर्पणातून जे अन्नार्पण तुम्ही याहवेहसाठी आणावयाचे ते हे: त्याची चरबी, पाठीच्या हाडाजवळून कापलेली संपूर्ण चरबीदार शेपटी, आतील अवयव आणि त्याला जोडून असलेली सर्व चरबी,
कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.
याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून याजक या सर्वाचे वेदीवर हवन करेल.
“ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,
तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील.
जे काही अर्पण तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण म्हणून आणता ते अशाप्रकारे असावे: आतील अवयव आणि आतड्यांवरील सर्व चरबी,
कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.
याजक त्यांचे अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करतील, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. सर्व चरबी याहवेहसाठी आहे.
“ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ”
एखाद्या अभिषिक्त याजकाकडून अजाणतेने घडलेल्या पापामुळे लोकांवर दोष आला, तर पापार्पण म्हणून याहवेहला त्याने एक निर्दोष गोर्हा अर्पण करावा.
त्याने तो गोर्हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा.
मग अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे थोडे रक्त सभामंडपामध्ये नेऊन त्यात आपली बोटे बुडवून
याजकाने पवित्रस्थान वेगळे करणार्या पडद्यासमोर याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.
नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.