Skip to content

Measures बद्दल बायबलमधील वचने

41 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांच्या ओंजळीत असलेले पाणी कोणी मोजले आहे, किंवा त्यांच्या हाताच्या रुंदीने आकाशात चिन्हे मापली आहेत? पृथ्वीवरील धूळ टोपलीत कोणी ठेवली आहे, किंवा पर्वतांचे वजन तराजूवर कोणी केले आहे आणि कोणी टेकड्या तोलल्या आहेत?

  2. कारण याहवेह जाहीर करतात, ‘मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझी मुक्तता करेन. जरी ज्या राष्ट्रात मी तुझी पांगापांग केली, त्या राष्ट्रांचा मी समूळ नायनाट केला, तरी मी तुझा पूर्णपणे नायनाट करणार नाही. मी तुला योग्य शासन करेन, पण ते मर्यादित; तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.’

  3. आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल.

  4. त्याचप्रमाणे हिनाचा सहावा भाग पाणी घेऊन तेही नेमलेल्या वेळेतच पी.

  5. नंतर याहवेहने मला म्हटले: “हे मानवपुत्रा, यरुशलेममध्ये मी भाकरीचा पुरवठा खंडित करणार आहे. लोक कष्टी होऊन तोलून अन्न खातील आणि निराशेने पाणी मापून पितील.

  6. याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.

  7. एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे.

  8. बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).

  9. हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय?

  10. जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा.

  11. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे सात मैल असलेल्या अम्माऊस नावाच्या गावी चालले होते.

  12. त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.

  13. येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.

  14. त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली.

  15. जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे.

  16. ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती.